MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

सूची - A आणि सूची - B मधील योग्य जोड्या जुळवा. +-----+-------------------------------------+-------+-----------------+ | | सूची - A | | सूची - B | +-----+-------------------------------------+-------+-----------------+ | (a) | एकेरी नागरिकत्व | (i) | इंग्लंड (युके) | | (b) | न्यायालयीन पुनर्विलोकन | (ii) | अमेरिका (युएसए) | | (c) | राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे | (iii) | आयर्लंड | | (d) | केंद्र-राज्य संबंधातील समवर्ती सूची | (iv) | ऑस्ट्रेलिया | +-----+-------------------------------------+-------+-----------------+

Match the following pairs List "A" with List "B". +-----+-----------------------------------------+-------+---------------------+ | | List - A | | List - B | +-----+-----------------------------------------+-------+---------------------+ | (a) | Single Citizenship | (i) | United Kingdom (UK) | | (b) | Judicial Review | (ii) | America (USA) | | (c) | Directive Principles of State Policy | (iii) | Ireland | | (d) | Concurrent list in Union-State Relation | (iv) | Australia | +-----+-----------------------------------------+-------+---------------------+

पर्याय (Options):
A

(a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)

अचूक उत्तर (Official Answer)
B

(a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

C

(a) - (iii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (ii)

D

(a) - (ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii)

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर (a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv) आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आलेले भारताचे संविधान हे एक असे दस्तऐवज आहे ज्याची काही वैशिष्ट्ये इतर संविधानांकडून घेतली गेली आहेत, इतर संविधानातून वैशिष्टे घेत असताना त्यांतील तर्कदोष टाळण्यासाठी त्यामध्ये काही फेरबदल करण्यात आले आहे. जगातील विविध राज्यघटनेंमधून घेतलेली काही वैशिष्ट्ये. • ब्रिटीश संविधान: संसदीय शासन, कायद्याचे अधिराज्य, वैधानिक कार्यपद्धति, एकेरी नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली, परमाधिकार प्राधिलेख, संसदीय विशेषाधिकार आणि द्विसदनवाद. • अमेरिकेचे संविधान: मूलभूत अधिकार, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींचा महाभियोग, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवेतून काढून टाकणे आणि उपराष्ट्रपतीचे पद. • आयरिश संविधान: राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन आणि राष्ट्रपती निवडण्याची पद्धत. • कॅनेडाचे संविधान: एक प्रबळ केंद्र असलेले संघराज्य, केंद्रास अवशिष्ट अधिकार निहित करणे, केंद्राद्वारे राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाची समुपदेशक अधिकारिता. • ऑस्ट्रेलियाचे संविधान: समवर्ती सूची, व्यापार, वाणिज्य आणि परस्परसंबंध स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. • वायमर संविधान: आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन. • सोव्हिएत संविधान: प्रास्ताविकेत मूलभूत कर्तव्ये आणि न्यायाचा आदर्श (सामाजिक, आर्थिक आणि राजकीय). • फ्रेंच संविधान: प्रजासत्ताक आणि प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे आदर्श. • जपानी संविधान: कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती. • दक्षिण आफ्रिकेचे संविधान: घटना दुरुस्ती आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?