MPSC Test Logo mpsctest.in
Polity Central Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत? a. लोकसभा नव्हे केवळ राज्यसभेमध्ये नामनिर्देशित सभासद असू शकतात. b. एंग्लो-इंडियन समुदायातील दोन सदस्यांना राज्यसभेमध्ये उमेदवारी देण्याची घटनात्मक तरतूद आहे. c. नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची केंद्रीय मंत्री म्हणून नेमणूक करण्यासाठी घटनात्मक बंधन नाही. d. नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.

Which of the following statements is/are correct? a. Only the Rajya Sabha and not Lok Sabha. can have nominated members. b. There is a constitutional provision for nominating two members belonging to the Anglo-Indian Community to the Rajya Sabha. c. There is no constitutional bar for nominated members to be appointed as Union Ministers. d. A nominated member can vote both in Presidential and Vice-Presidential elections.

पर्याय (Options):
A

a and b

B

c and d

C

Only b

D

Only c

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर केवळ c आहे. • राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान असणाऱ्या किंवा व्यावहारिक अनुभव असणार्‍या लोकांमधून 12 सदस्यांची राज्यसभेवर नेमणूक करतात. नामनिर्देशनाच्या या तत्त्वामागील तर्क म्हणजे प्रख्यात व्यक्तींना निवडणुकीच्या प्रक्रियेत न जाता राज्यसभेत स्थान प्रदान करणे. येथे हे लक्षात घ्यावे की अमेरिकन सिनेटमध्ये नामनिर्देशित सदस्य नाहीत. • लोकसभेत, राष्ट्र्पतींद्वारे अँग्लो इंडियन समुदायामधील 2 सदस्यांना उमेदवारी दिली जाते. म्हणून विधान a आणि b अयोग्य आहेत. • नामनिर्देशित सदस्य केवळ उप-राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतो आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नाही. म्हणून विधान d अयोग्य आहे. • पंतप्रधानांची नेमणूक केल्यास नामनिर्देशित सदस्य मंत्री होऊ शकतो. • नुकतेच संसदेने 104 वी घटनादुरुस्ती (126 वा घटनादुरुस्ती विधेयक) अधिनियमित केली जी 25 जानेवारी 2030 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला 10 वर्षांचे आरक्षण देण्याशी संबंधित होती. • राज्यघटनेत लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव ठेवण्याची आणि एंग्लो-इंडियन समुदायाला नामनिर्देशन करून प्रतिनिधित्व करण्याची तरतूद आहे. • राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून 70 वर्षांच्या कालावधीसाठी ही तरतूद करण्यात आली असून 25 जानेवारी 2020 रोजी कालबाह्य होणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण आणखी 10 वर्षांनी 25 जानेवारी 2030 पर्यंत वाढविण्यात यावे, असे या विधेयकात नमूद आहे. तथापि, विधेयकातील तरतुदी अँग्लो-इंडियन्स समाजासाठी पुरविल्या जात नसल्यामुळे उमेदवारीच्या स्वरुपात अँग्लो-इंडियन्सचे आरक्षण 25 जानेवारी रोजी संपणार आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?