MPSC Test Logo mpsctest.in
Polity Constitutional Bodies
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणते UPSC चे वैधानिक कार्य नाही?

Which one of the following is not a statutory function of UPSC?

पर्याय (Options):
A

लोकसेवा आयोगाच्या उमेदवार भरती,पदोन्नती आणि लोकसेवा नियंत्रण या पद्धतींविषयी सरकारला सल्ला पुरवणे

B

सरकारी नोकरदार वर्गाचे हक्क,अधिकार आणि हित जपण्यासाठी

C

सरकारी नोकरदार वर्गाचे निवेदन ऐकणे आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे

D

राज्य लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय 4 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • राज्य लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे हे UPSC चे वैधानिक कार्य नाही पूरक माहिती: • संघ लोकसेवा आयोगाला सामान्यपणे UPSC अशा संक्षिप्त नावाने ओळखले जाते. ती भारतातील प्रमुख केंद्रीय उमेदवार भरती संस्था आहे. • ही संस्था अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवांच्या अ आणि ब गटासाठीच्या परीक्षा घेणे व त्यानंतरच्या नेमणुका करणे या जबाबदाऱ्या पार पाडते. • तर कर्मचारी प्रशिक्षण विभाग ही भारतातील केंद्रीय कर्मचारी संस्था आहे. • राज्यघटनेच्या चौथ्या भागात संघराज्य आणि राज्य सेवा या शीर्षकांतर्गत 315 ते 323 या कलमांत संघराज्ये आणि प्रत्येक राज्यासाठी लोकसेवा आयोगाची तरतूद केली गेली आहे. • अनुच्छेद 315 नुसार, संघराज्य पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना दृष्टीसमोर ठेवली गेली आहे. • यूपीएससी ही संस्था देशाच्या उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या काही मोजक्याच संस्थांपैकी एक आहे,ज्या स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहेत. • अनुच्छेद 316 नुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. • भारतीय राज्यघटनेच्या चौदाव्या भागात' केंद्र आणि राज्य सेवा या शीर्षकांतर्गत या संस्थेची सनद मजूर करण्यात आली आहे. • केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवांसंबंधी नेमणूका करण्यासाठीआयोगाची स्थापना करणे घटनेने बंधनकारक केले आहे. • या आयोगाने नियुक्ती, बदली, पदोन्नती आणि शिस्तभंगाच्या बाबींबाबतही शासनाने सल्लामसलत करणे आवश्यक आहे. • हा आयोग थेट राष्ट्रपतींकडे अहवाल देतो आणि त्यांच्यामार्फत सरकारला सल्ला देऊ शकतो. • तथापि,हा सल्ला मानणे सरकारला बंधनकारक नाही. • घटनात्मक प्राधिकरण असलेली यूपीएससी ही संस्था देशाच्या उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या काही मोजक्याच संस्थांपैकी एक आहे ज्या स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहेत. • कमिशनचे मुख्यालय धोलपूर हाऊस येथे असून दिल्लीत त्याचे स्वतःचे सचिवालय आहे. • प्रीती सुदान या UPSC च्या विद्यमान अध्यक्षा आहेत. • 1 ऑक्टोबर 1926 रोजी लोकसेवा आयोगाची स्थापना केली गेली, त्यानंतर भारत सरकार अधिनियम 1935 या कायद्याद्वारे फेडरल लोकसेवा आयोग या नावाने या आयोगाची पुनर्रचना करण्यात आली; स्वातंत्र्यानंतर आयोगाचे नामकरण केंद्रीय लोकसेवा आयोग असे केले गेले.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?