MPSC Test Logo mpsctest.in
Polity Non-Constitutional Bodies/Statutory bodies
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत? 1. आयोग ही बहुसदस्यीय संस्था आहे. 2. केवळ भारताचे निवृत्त सरन्यायाधीश हे अध्यक्ष असले पाहिजेत. खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

Which of the following statements is/are correct regarding National Human Rights Commission? 1. The commission is a multi-member body. 2. The chairman should be retired chief justice of India only Select the correct answer by using the codes given below.

पर्याय (Options):
A

केवळ 1

अचूक उत्तर (Official Answer)
B

केवळ 2

C

1 आणि 2 दोन्ही

D

1 किंवा 2 कोणतेही नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
केवळ 1 हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • मानवी हक्कांचे संरक्षण (सुधारणा) अधिनियम, 2019: • मानवी हक्क संरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2019 हे गृहमंत्री अमित शाह यांनी 8 जुलै 2019 रोजी लोकसभेत सादर केले. • हे विधेयक मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मध्ये सुधारणा करते. • या अधिनियमात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), राज्य मानवी हक्क आयोग (SHRC), तसेच मानवी हक्क न्यायालये यांची तरतूद आहे. • NHRC ची रचना: • या अधिनियमानुसार, NHRC चे अध्यक्ष ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी राहिलेली व्यक्ती असते. • आयोग ही बहुसदस्यीय संस्था आहे. त्यामुळे, विधान 1 योग्य आहे. • सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी राहिलेली व्यक्ती NHRC चे अध्यक्ष असेल अशी तरतूद करण्यासाठी या अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे, विधान 2 योग्य नाही. • मानवी हक्कांचे ज्ञान असलेल्या दोन व्यक्तींना NHRC चे सदस्य म्हणून नियुक्त करण्याची तरतूद या अधिनियमात आहे. • विधेयकाने यात सुधारणा करून तीन सदस्यांची नियुक्ती करण्याची मुभा दिली आली असून त्यापैकी किमान एक महिला असेल. • या अधिनियमानुसार, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यासारख्या विविध आयोगांचे अध्यक्ष NHRC चे सदस्य आहेत. • या विधेयकात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग आणि विकलांग व्यक्तींचे मुख्य आयुक्त यांना NHRC चे सदस्य म्हणून समाविष्ट करण्याची तरतूद आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?