MPSC Test Logo mpsctest.in
Polity Local Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पंचायतींचा कालावधी _________ असतो.

The duration of panchayat is:

पर्याय (Options):
A

निकाल जाहीर झाल्यापासून पाच वर्षांपर्यंत

B

निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत

C

पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत

अचूक उत्तर (Official Answer)
D

शेवटची पंचायत विसर्जित झाल्यापासून पाच वर्षांपर्यंत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: पंचायत राज व्यवस्था: • संविधानातील भाग IX, भारतातील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. • 1992 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये, पंचायती राजचे संवैधानिकीकरण करण्यात आले. • पंचायतीमधील सर्व जागा, पंचायत क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या व्यक्तींद्वारे भरण्यात येतील. • प्रत्येक पातळीवरील पंचायतीच्या अध्यक्षांची निवड, राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे करण्यात आलेल्या तरतुदीनुसार केली जाते. • प्रत्येक पंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, तिच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही • राज्य विधानमंडळ कायद्यानुसार, त्याचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी विसर्जित केले जाऊ शकते. • ज्या कालावधीसाठी विसर्जित पंचायत चालू राहिली असती तो उर्वरित कालावधी सहा महिन्यांपेक्षा कमी असेल त्या बाबतीत, अशा कालावधीसाठी पंचायत घटित करण्याकरिता या खंडान्वये कोणतीही निवडणूक घेण्याची आवश्यकता असणार नाही. • 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि राज्य विधानसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असलेल्या सर्व व्यक्ती पंचायत सदस्य म्हणून पात्र आहेत. • राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे, त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा कार्यपद्धतीनुसार आणि अशा मर्यादांना अधीन राहून असे कर, शुल्क, पथकर आणि फी आकारण्यास, वसूल करण्यास आणि विनियोजित करण्यास पंचायतीला प्राधिकार देऊ शकेल. • पंचायतींच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी आणि शिफारशी करण्यासाठी दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करण्यात येईल. • पंचायतींच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या, आणि निवडणुका घेण्याच्या कामाचे अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण, राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाकडे निहित असेल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?