MPSC Test Logo mpsctest.in
Polity Local Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

महाराष्ट्रातील पंचायत राज संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (a) सरपंच पंचायत समितीच्या संभापतींना उद्देशून आपल्या सहीने लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. (b) उप-सरपंच पंचायत समितीला उद्देशून आपल्या सहीने लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements with reference to the Panchayat Raj in Maharashtra: (a) The Sarpanch may resign his office by writing under his hand addressed to the Chairman of the Panchayat Samiti. (b) The Upa-Sarpanch may resign his office by writing under his hand addressed to the Panchayat Samiti. Which of the statements given above is/are correct?

पर्याय (Options):
A

फक्त (a)

अचूक उत्तर (Official Answer)
B

फक्त (b)

C

(a) आणि (b) दोन्ही

D

(a) किंवा (b) कोणतेही नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
बरोबर उत्तर पर्याय 1 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम: • या कायद्याला 1958 चा बॉम्बे ग्रामपंचायत अधिनियम म्हणता येईल. • सध्याच्या काळात अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअंतर्गत स्थापन केलेल्या महानगरपालिका, नगरपालिका किंवा कटक मंडळ हद्दीतील क्षेत्रे वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होतो. अधिनियमाचे कलम 34: सरपंच किंवा उप-सरपंच यांनी दिलेला राजीनामा. • सरपंच पंचायत समितीच्या संभापतींना उद्देशून आपल्या सहीने लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यामुळे विधान (a) बरोबर आहे. • उप-सरपंच सरपंचाला उद्देशून आपल्या सहीने लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यामुळे विधान (b) बरोबर नाही. कलम 35: अविश्वास प्रस्ताव • एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा कमी नसलेल्या आणि सरपंच किंवा उप-सरपंच यांच्या विरोधात पंचायतीच्या कोणत्याही सभेत बसून मतदान करण्याचा सध्या अधिकार असलेल्या सदस्यांनी त्यासंबंधी तहसीलदार यांना अशी नोटीस दिल्यानंतर दिल्यानंतर अविश्वासाचा ठराव मांडता येतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?