MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील विधाने विचारात घ्या: (a) नागपूर करार हा सप्टेंबर 1953 मध्ये झाला त्याने मराठी भाषिकांचे लगतच्या प्रदेशांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला चालना मिळाली. (b) नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे दरवर्षी नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते. (c) मुख्यमंत्री वाय.बी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 मे,1956 रोजी झाली. (d) एस्.एम्. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विविध पक्षांच्या बैठकीत पुणे 6 फेब्रुवारी, 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.

Consider the following statements : (a) The Nagpur Pact was concluded in September 1953. It led to the creation of the State Maharashtra from contiguous Marathi speaking areas. (b) The most prominent clause of the Nagpur Pact required one session of the Maharashtra State Assembly in Nagpur every year. (c) Bilingual Mumbai State was established on 1^(st )May, 1956 under the Chief Ministership of Y.B. Chavan. (d) The meeting of various opposition parties presided over by S.M. Joshi formed Samyukta Maharashtra Samiti in Pune 6^(th) February, 1956. Which of the statements given above are correct ?

पर्याय (Options):
A

फक्त (a) आणि (b)

अचूक उत्तर (Official Answer)
B

(a), (b) आणि (c)

C

(b), (c) आणि (d)

D

वरील सर्व

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर फक्त (a) आणि (b) हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: नागपूर करार • 28 सप्टेंबर 1953 रोजी भारतीय राजकीय नेत्यांमध्ये नागपूर करार झाला. म्हणून a हे विधान योग्य आहे. • त्यामुळे तत्कालीन बॉम्बे राज्य, मध्य प्रदेश राज्य आणि हैदराबाद राज्यातील सलग मराठी भाषिक भागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. • भारत सरकारने 29 डिसेंबर 1953 रोजी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पहिली राज्य पुनर्रचना समिती नेमली. • या करारात प्रस्तावित मराठी राज्याच्या सर्व प्रदेशांच्या समान विकासाची हमी देण्यात आली आहे. नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार विदर्भाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे दरवर्षी नागपूर येथे किमान सहा आठवड्यांच्या कालावधीचे अधिवेशन आवश्यक होते. म्हणून b हे विधान योग्य आहे. • 1953 मध्ये करारावर स्वाक्षरी करणारे होते; - • यशवंतराव चव्हाण आणि • डॉ आबासाहेब खेडकर • रामराव कृष्णराव पाटील, • 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले जे INC पक्षाचे होते आणि पदावर असताना मृत्यू पावणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते. म्हणून c हे विधान अयोग्य आहे. • संयुक्त महाराष्ट्र चळवळ संघटनेची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात झाली. समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्षपदी श्रीपाद अमृत डांगे. उपाध्यक्षपदी डॉ.टी.आर.नरवणे व सरचिटणीसपदी एस.एम.जोशी यांची निवड करण्यात आली. म्हणून d हे विधान अयोग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?