सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
अल्पसंख्यांक समुदायाची ओळख धर्म, भाषा लिपी आणि संस्कृतीच्या आधारे केली गेली आहे. घटनेतील विविध कलमे या समुदायांना त्यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य देतात. कलम 29 आणि कलम 30 अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी काही सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांची हमी देतात.
• कलम 29(1) अशी हमी देते की " भारताच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही भागाला त्या भागात असणारी भाषा,लिपी किंवा संस्कृती जोपासण्याचा अधिकार आहे."
• कलम 29(2) अन्वये कोणालाही शैक्षणिक समानता नाकारली जाऊ शकत नाही ज्यानुसार राज्याद्वारे सांभाळलेल्या किंवा राज्य साहाय्य करत असलेल्या कोणत्याही संस्थेत वंश,जात,भाषा या आधारे कोणालाही प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही.
• कलम 29(3) यामध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही नागरिकांना राज्याने सांभाळलेल्या आणि केवळ धर्म, वंश, जाती, भाषा किंवा त्यापैकी कोणाच्याही आधारावर निधी किंवा मदत घेतलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश देण्यास नाकारले जाऊ शकत नाही.
• कलम 30 (1) धर्म किंवा भाषेवर आधारित असणार्या सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालविण्याचा अधिकार आहे.
• कलम 30(2) हे कलम “धर्म किंवा भाषेवर आधारित असलेल्या, अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या अनुदानाच्या बाबतीत राज्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेशी भेदभाव करणार नाही” असे नमूद करते.
म्हणूनच, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांची हमी देतात.
Minorities group have been identified on the basis of religion, language script and culture. Various articles of the constitution provide freedom to these groups to keep intact their religious cultural and linguistic identities. Article 29 and Article 30 guarantee certain cultural and educational rights to minorities to establish and administer educational institution.
• Article 29(1) stipulates that ‘‘any section of the citizens residing in the territory of India or any part thereof having a distinct language, script or culture of its own shall have the right to conserve the same’’
• Equality of educational opportunity can not be denied to anyone under Article 29(2) according to which admission cannot be refused to anyone on the basis of race, caste, language in any institution maintained by the state or aided by the state.
• Article 29(3) lays down that no citizen shall be denied admission into any educational institution maintained by the state or receiving aid, funds on grounds only of religion, race, caste, language or any one of them.
• Article 30(1) enjoins that All minorities, whether based on religion or language, shall have the right to establish and administer educational institutions of their own choice.
• Article 30(2) states that “ the state shall not discriminate against any educational institution in respect of grant-in-aid on the ground that it is under the management of a minority, whether based on religion or language”.
Hence, we conclude that articles 29 and 30 guarantee cultural and educational rights to minorities.