सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर पर्याय 3 आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
शाहीर अण्णा भाऊ साठे (1920-1969):
• अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला.
• अण्णाभाऊ साठे हे दलित समाजातील पहिले लेखक होते.
• अमरशेख यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे शाहिरी केली.
• त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता.
• गिरणी कामगारांच्या कामामुळे त्यांचा साम्यवादी चळवळीशी संबंध आला.
• भटक्या समाजाचे प्रश्न अण्णाभाऊंनी अत्यंत आत्मीयतेने कथा व कादंबऱ्यांतून मांडले.
• 'स्मशानातील सोने' ही त्यांची महत्त्वाची कथा आहे.
• 'फकिरा' ही त्यांची सर्वोत्तम कादंबरी असून वास्तव, आदर्श, स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीत आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून अस्सल दलित जीवन मांडले.
• लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक लावणी (त्याला छक्कड म्हणतात) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणा गीत ठरले.
• ती छक्कड म्हणजे 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली' अशी होती.
• या लावणीत संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा आहे. म्हणून विधान (d) बरोबर आहे.
• उत्कृष्ट तमाशा कलावंत म्हणून देखील त्यांनी नाव कमावले. त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
• कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचारासाठी आपल्या कलेचा उपयोग व्हावा म्हणून अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, व शाहीर गव्हाणकर यांनी 1944 मध्ये 'लाल बावटा' कलापथकाची स्थापना केली. म्हणून विधान (a) बरोबर आहे.
• लालबावटा कलापथकासाठी त्यांनी अनेक लावण्या, पोवाडे व वगनाट्ये लिहिली. या पथकाच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे मोठे कार्य केले.
• कादंबऱ्या- फकिरा, वारणेचा वाघ, अलगुज, चित्रा. इ.
• त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला होता. तिला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना होती. या कादंबरीत वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले आहे.
• कथा- कृष्णकाठच्या कथा, गजाआड, बंदुका, बरबाद्या बंजारी. ठासलेल्या
• वगनाट्य- अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापऱ्या - चोर.
• पोवाडा व लावण्या- स्टॅलिनग्राडचा पोवाडा, 'माझी मैना गावाकडे राहिली'.
लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा:
• गोपळबाबा वलंगकर हे दलित समाजातील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जातात. म्हणून विधान (c) चुकीचे आहे.
• दलित पॅंथर संघटनेची स्थापना 1972 मध्ये झाली होती, तर अण्णा भाऊ साठे यांचा मृत्यू 1972 मध्ये झाला होता. म्हणून विधान (b) चुकीचे आहे.
The correct answer is Option 3.
Explanation & Key Takeaways:
Shaheer Anna Bhau Sathe (1920-1969):
• Anna Bhau Sathe was born in 1920 at Wategaon in Sangli district.
• Annabhau Sathe was the first writer from the Dalit community.
• He did Shayari with Amarshekh for many years.
• He was influenced by communism.
• His work as a mill worker brought him into contact with the communist movement.
• Annabhau presented the problems of the nomadic society through stories and novels with great intimacy.
• 'Gold in the cemetery' is his most important story.
• 'Fakira' is his best novel and there is a mixture of reality, ideals and dreams in this novel. He presented authentic Dalit life through his literature.
• A Lavani (called Chakkad) written by the democrat Annabhau Sathe became the inspiration song of the Sanyukta Maharashtra movement.
• That chakkad meant 'Mazhi maina lived on the village, Mazhya jivachi hotiya kahili'.
• In this lavani there is a declaration of Samyukta Maharashtra Samiti. Hence statement (d) is correct.
• He also earned a reputation as an excellent tamasha artiste. He transformed the traditional Tamasha into a modern folk drama.
• In 1944 Annabhau Sathe, Shahir Amar Sheikh and Shahir Gavankar formed the 'Lal Bavata' Art Troupe to use their art for the propaganda of the Communist Party. Hence statement (a) is correct.
• He wrote many Lavanyas, Povades and Vaganatyas for Lalbavata Kalapatha. Through this team, he did a great job of public awareness.
• Novels- Fakira, Tiger of Warane, Alguj, Chitra. etc.
• His novel Fakira won the state award. She had a foreword by V.S. Khandekar. In this novel, reality, ideals and dreams are mixed.
• Stories- Stories of Krishnakath, Gajaad, Banduka, Barbadya Banjari. Thaslelya
• Vaganatya- Akle's Story, Majhi Mumbai, Khapreya - Chor.
• Povada and Lavanya- Povada of Stalingrad, 'My maina stayed at the village'.
Common Pitfalls:
• Gopalbaba Valangkar is known as the first journalist of the Dalit community. Hence statement (c) is incorrect.
• Dalit Panther Organization was founded in 1972, while Anna Bhau Sathe died in 1972. Hence statement (b) is incorrect.