MPSC Test Logo mpsctest.in
History India under East India Company’s Rule
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढील विधानांचा विचार करा: 1. त्यांनी सोळाव्या शतकात भारतात वसाहती स्थापन केल्या. 2. त्यांच्या दबावाखाली मुघलांनी इंग्रजांना व्यापारी हक्क देण्यास नकार दिला. 3. दमण, हुगळी आणि सालसेट येथे त्यांची वस्ती होती. वरील विधाने खालीलपैकी कोणत्या युरोपियन सत्तेशी संबंधित आहेत?

Consider the following statements: 1. They established settlements in India during sixteenth century. 2. Mughals refused to grant trading rights to English under their pressure. 3. They had settlements at Daman, Hugli and Salsette. The above statements are related to which of the following European powers?

पर्याय (Options):
A

पोर्तुगीज

अचूक उत्तर (Official Answer)
B

डच

C

फ्रेंच

D

डेन (डॅनिश)

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
बरोबर उत्तर पोर्तुगीज आहे. • 1498मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत बंदरात पोहोचला आणि पुढच्या वर्षी पोर्तुगालला परतला. • पेड्रो अल्वारेझ कॅब्राल 1500मध्ये भारतात आला आणि वास्को द गामा याने देखील 1502मध्ये भारत दुसरी फेरी केली. • त्यांनी कालिकत, कॅनानोर आणि कोचीन येथे व्यापार केंद्रे स्थापन केली. • भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर फ्रान्सिस डी अल्मेडा होता. • नंतर 1509मध्ये अल्बुकर्क याला भारतातील पोर्तुगीज प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. 1510 मध्ये त्याने विजापूरच्या राज्यकर्त्याकडून गोवा ताब्यात घेतला. • त्यानंतर गोवा भारतातील पोर्तुगीज वसाहतीची राजधानी बनली. • अल्बुकर्क याने मलक्का आणि सिलोन ताब्यात घेतले. • कालिकत येथेही त्याने किल्ला बांधला. • अल्बुकर्क यांचे निधन झाले आणि त्याच्या उत्तराधिकारींनी पश्चिम किनारपट्टीवर दमण, सालसेट आणि बॉम्बे (मुंबई) येथे तसेच पूर्व किनारपट्टीवरील बंगालमधील मद्रास व हुगळी जवळील सॅन थोम येथे पोर्तुगीज वसाहती स्थापन केल्यात. • इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600मध्ये झाली. • 1609मध्ये कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीरच्या शाही दरबारात सूरत येथे इंग्रजी व्यापार केंद्र स्थापनेची परवानगी घेण्यासाठी दाखल झाला परंतु पोर्तुगीजांच्या दबावामुळे मुघल बादशहाने त्याला नकार दिला. • त्यानंतर 1612मध्ये जेव्हा पोर्तुगीजांचे आरमार इंग्रजांनी पराभूत केले, तेव्हा जहांगीरने इंग्रजांना फर्मान (परवानगी पत्र) जारी केले आणि त्यांनी 1613मध्ये सूरत येथे व्यापारी वखारी सुरू केला. • म्हणून पर्याय 1 बरोबर आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?