MPSC Test Logo mpsctest.in
History Socio - Religious Reform Movements in the 19th and 20th CE India
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

गोपाळ हरी देशमुखांबद्दल पुढे दिलेल्यापैकी कोणते/कोणती वाक्य/वाक्ये चुकीचे आहे/आहेत? (a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली. (b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे. (c) त्यांनी महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे प्रथम आयात केले. पर्यायी उत्तरे:

Which of the following sentence/s about Gopal Hari Deshmukh is/are incorrect? (a) He started the newspapers Induprakash, Lokhitavadi and Gyanodaya. (b) He was of the opinion that Indians should take their political rights from the British as the economic condition of the country would not improve unless the country was given independence. (c) They first imported sugarcane from Mauritius into Maharashtra. Alternative Answers:

पर्याय (Options):
A

फक्त (b) आणि (c)

B

फक्त (c)

C

फक्त (a)

D

फक्त (a) आणि (c)

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय 4 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: गोपाळ हरी देशमुख (1823-1892): • महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. • लोकहितवादींचे नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म इ. स. 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. • इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराथी, हिंदी इ. भाषा त्यांनी आत्मसात केल्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले. • पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज्ज आदी पदांवर त्यांनी काम केले. • त्यांना सरकारने 'रावबहादूर' ही पदवी दिली होती. • लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळवून सन्मानित झाले. • भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला 'शतपत्रे' असे म्हणतात. • त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन व समाजहिताविषयीची कळकळ दिसून येते. • 'लक्ष्मीज्ञान', 'गीतातत्व', 'जातिभेद', 'भरतखंडपर्व', 'भिक्षुक', 'लंकेचा इतिहास', 'ऐतिहासिक गोष्टी', 'पानिपतची लढाई', 'कलियुग' आदी ग्रंथांचे लेखन केले. • लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचे विचार त्यांनी मांडले. • भारतीय समाजाची जातिव्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर लोकहितवादींनी जोरदार टीका केली. • उच्चवर्णीयांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचारविचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला. • समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विदया, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उदयोगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला. • केवळ आणि धार्मिक सुधारणा करून देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही तर या सुधारणाशिवाय देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे असा विचार गोपाळरावांनी प्रस्तुत केला. • या ध्येय पूर्ततेसाठी जनतेने देशातील परकीय सत्ता हाकलून लावण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय हक्क मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा गोपाळरावांनी जनतेसमोर विचर मांडला. म्हणून विधान (b) बरोबर आहे. लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा: • नाना शंकरशेठ महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे प्रथम आयात केले. म्हणून विधान (c) चुकीचे आहे. • विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदूप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले होते. गोपाळ हरी देशमुख यांनी या सप्ताहिकामधून लेखन केले होते. म्हणून विधान (a) चुकीचे आहे. • ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते. • हे वृत्तपत्र 1843 साली सुरू झाले. • अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. • ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?