सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
• 5-18 वर्षे वयोगटातील भारताची लोकसंख्या-शाळेत जाणारी लोकसंख्या-2011 मध्ये 351 दशलक्ष वर पोहोचली आणि तेव्हापासून त्यात घट होत आहे. जनगणना अंदाज (2011-2036) अहवालानुसार 2036 मध्ये ही घट 296 दशलक्ष होईल. त्याचप्रमाणे, 2021 मध्ये, भारताची 19-23 वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणप्राप्त करणारी लोकसंख्या 127 दशलक्ष वर जाण्याची अपेक्षा आहे आणि त्यात घट होऊन ती 2036 पर्यंत 115 दशलक्ष होईल. म्हणून विधान (b) योग्य आहे.
• युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हिजन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019 नुसार: भारताच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरात 2011 मध्ये 1.289% वरून 2020 मध्ये 0.989% इतकी घट झाली आहे. म्हणून विधान (a) योग्य आहे.
• भारतातील 15 राज्यांमधील एकूण प्रजनन दर (TFR) 2016 ते 2020 दरम्यान 2.1 किंवा त्यापेक्षा कमी बालकांपर्यंत घसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एखाद्या देशाच्या एकूण प्रजनदरात 2.1 इतकी घट झाली तर त्या लोकसंख्येने प्रतिस्थापन प्रजनन क्षमता गाठली आहे असे म्हटले जाते. या स्तरावर, त्या देशाची लोकसंख्या वाढ थांबते आणि कालांतराने ती स्वतःला केवळ ‘प्रतिस्थापित’ करते.
• भारतासाठी, एकूण प्रजनन दर सध्या 2.2 असण्याचा अंदाज आहे. 2020 ते 2036 दरम्यान, भारताची लोकसंख्या 1.36 अब्ज वरून 1.51 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तथापि, भारतीयांना कमी अपत्ये असण्याचा परिणाम 5-23 वर्ष वयोगटात जाणवेल, ज्यांचा एकूण लोकसंख्येतील हिस्सा 2021 मध्ये 34% वरून 2036 मध्ये 27% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
The correct answer is an (a) and (b) both are correct.
Explanation & Key Takeaways:
• India’s population in the age band of 5-18 years—the typical school-going population—peaked in 2011, at 351 million, and has been falling since. The census population projections (2011-2036) report see this declining to 296 million in 2036. Similarly, India’s population in the age band of 19-23 years-typical for higher education is expected to peak in 2021 at 127 million and decline to 115 million by 2036. Hence statement (b) is correct
• According to the United Nations Population Division World Population Prospects: 2019 India's Annual Population Growth rate has been declining from 1.289% in 2011 to 0.989% in 2020. Hence statement (a) is correct.
• The total fertility rate (TFR) in 15 states of India has been falling to 2.1 children or less between 2016 and 2020. According to the World Health Organisation, a country is said to have reached replacement fertility when its TFR falls to 2.1. At this level, its population stops growing, and only ‘replaces’ itself over time.
•
For India, the TFR is currently estimated at 2.2. Between 2020 and 2036, India’s population is expected to grow from 1.36 billion to 1.51 billion. However, the effect of Indians having fewer children will be felt in the 5-23 years band, whose share in the total population is expected to contract from 34% in 2021 to 27% in 2036.