science
Refraction and Reflection
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
तारे चमकण्यासाठी कोणती घटना जबाबदार आहे?
What phenomenon is responsible for the twinkling of stars?
पर्याय (Options):
A
विवर्तन
B
अचूक उत्तर (Official Answer)
अपवर्तन
C
अपस्करण
D
प्रकाशाचे विकिरण
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर अपवर्तन हे आहे.
• वातावरणातील अपवर्तन हे ताऱ्यांच्या चमकण्यासाठी कारणीभूत आहे.
• ताऱ्यांकडून प्रकाश जसा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतो आणि अपवर्तित होतो त्यामुळे तारे चमकतात.
• अपवर्तन - जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रवास करतो तेव्हा तो त्याच्या मूळ पथापासून विचलित होतो या घटनेलाच अपवर्तन असे म्हणतात.
• उदाहरणार्थ - जेव्हा प्रकाश विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रवास करतो तेंव्हा तो लंबाकडे विचलित होतो.
• अपवर्तनाचे नियम
• आपतन कोनाचा साइन आणि अपवर्तन कोणाचा साइन यांचे गुणोत्तर स्थिर असते.
• आपतन बिंदूवर लंब, आपतन किरण आणि परावर्तित किरण एकाच प्रतलात असतात.
• विवर्तन - प्रकाश किरण त्याच्या पथामधील अडथळ्यावर आदळल्यानंतर वाकतो.
• विवर्तन हा व्यतीकरनाचा परिणाम आहे.
• अपस्करण - दृश्य प्रकाशाचे त्याच्या विविध रंगांमध्ये होणाऱ्या विभाजनाला अपस्करण असे म्हणतात.
• उदाहरणार्थ - लोलक (पांढऱ्या प्रकाशाचे सात रंगांमध्ये विभाजन होणे)
• विकिरण - ही एक घटना आहे ज्यामध्ये प्रकाशाचे त्याच्या सरळ रेषेपासून धूळ किंवा वायूचा रेणू, पाण्याची वाफ इ. यांना आदळून विचलन होते.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram
Solution Diagram