सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
फक्त 2 जोड्या हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
बारा-लाचा खिंड
• हिमाचल प्रदेश राज्यातील लाहौल जिल्हा आणि लडाखमधील लेह जिल्हा यांना जोडणारी झास्कर रांगेतील ही एक उंच पर्वतीय खिंड आहे. लेह-मनाली हा महामार्ग या खिंडीतून जातो. म्हणून, जोडी (1) बरोबर आहे.
• चिनाब नदीचे दोन मुख्य प्रवाह, चंद्रा आणि भागा, बारा-लाचा खिंडीजवळ उगम पावतात.
• चंद्राचा उगम या प्रदेशातील हिमनदीतून होतो. चिनाबचे मूळ नाव, "चंद्रभागा", जे चंद्रा आणि भागा नद्यांच्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करते.
• ही खिंड भागा नदी आणि युनाम नदी यांच्यातील जल-विभाजक म्हणूनही काम करतो.
पालघाट खिंड
• उत्तरेस निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेस अनामलाई टेकड्या यांच्या मध्ये ही खिंड स्थित आहे.
• ही खिंड सुमारे 32 किमी इतकी रुंद आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांच्या सीमेवर पसरलेली आहे, ही खिंड या दोन राज्यांमधील केंद्रीय दळणवळण मार्ग म्हणून ओळखली जाते.
• पालघाट ही नैऋत्य भारतातील पश्चिम घाट पर्वतरांगेतील एक मोठी खिंड आहे. म्हणून, जोडी (2) बरोबर नाही.
• पालघाट खिंडीचा दक्षिण भारताच्या हवामानावर प्रभाव पडतो; आर्द्र नैऋत्य मान्सून तसेच बंगालच्या उपसागरातून येणारी वादळे ही या खिंडीतून पर्वतास ओलांडतात.
हल्दीघाटी
• ही भारतातील राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील अरवली पर्वतरांगेत वसलेली खमनोरे व बालिचा गावामधील एक पर्वतीय खिंड आहे, जी राजसमंद शहर आणि उदयपूर या शहरांना जोडते. म्हणून, जोडी (3) बरोबर नाही.
• ही खिंड उदयपूरपासून 44 किमी अंतरावर स्थित आहे.
• या खिंडीला हल्दीघाटी हे नाव हळदीच्या रंगाच्या पिवळ्या मातीपासून पडले असे मानले जाते.
दिफू खिंड
• ही भारत, चीन व म्यानमारच्या विवादित त्रि-बिंदू सीमांच्या क्षेत्राभोवतीची एक पर्वतीय खिंड आहे.
• दिफू खिंड ही भारतातील पूर्व अरुणाचल प्रदेशकडे जाणारा एक सामरिक मार्ग आहे. म्हणून, जोडी (4) बरोबर आहे.
• ही खिंड मॅकमोहन रेषेवर स्थित आहे. तसेच ती अरुणाचल प्रदेश राज्याच्या अंजाव या जिल्ह्यातील हवाई-वालोंग-डोंग-किबिथू-काहो-धीपू खिंडीमार्गे हवाई येथील जिल्हा मुख्यालयाच्या 120 किमी ईशान्येस स्थित आहे.
• ही खिंड भारत, म्यानमार आणि चीनच्या विवादित त्रि-बिंदू सीमांच्या क्षेत्राभोवती स्थित आहे
The correct answer is Only two pairs.
Explanation & Key Takeaways:
Bara-lacha Pass
• It is a high mountain pass in Zanskar range, connecting Lahaul district in Himachal Pradesh to Leh district in Ladakh. The Leh–Manali Highway traverses the pass. Hence, pair 1 is correct.
• The two headwaters of the Chenab River, Chandra and Bhaga, originate near the Baralacha Pass.
• The Chandra originates from glacier in this region. The native name of Chenab, "Chandrabhaga", represents the union of Chandra and Bhaga rivers downstream.
• The pass also acts as a water divide between the Bhaga river and the Yunam river.
Palghat Pass
• It is located between the Nilgiri Hills to the north and the Anaimalai Hills to the south.
• It is about 32 km wide and straddles the Kerala–Tamil Nadu border, serving as a central communication route between those two states.
• Palghat is a major break in southwestern India's Western Ghats mountain range. Hence, pair 2 is incorrect.
• Palghat Gap also influences southern India’s climate; the wet southwest monsoons as well as storms from the Bay of Bengal cross the mountains through the opening.
Haldighati
• It is a mountain pass between Khamnore and Balicha village situated at Aravalli Range of Rajsamand district in Rajasthan, India which connects Rajsamand city and Udaipur city. Hence, pair 3 is incorrect.
• The pass is located at a distance of 44 kilometres from Udaipur.
• The name 'Haldighati' is believed to have originated from the turmeric-coloured yellow soil of the area.
Diphu Pass
• It is a mountain pass around the area of the disputed tri-point borders of India, China, and Myanmar.
• Diphu Pass is also a strategic approach to eastern Arunachal Pradesh in India. Hence, pair 4 is correct.
• It lies on the McMahon Line. It is located in Anjaw district of Arunachal Pradesh, 120 km northeast of district headquarter at Hawai via the Hawai-Walong-Dong-Kibithu-Kaho-Dhipu Pass route.
• It is located around the area of the disputed tri-point borders of India, Myanmar, and China
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):