geography
Indian Economic and Human Geography
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
भारतातील कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळांची घनता सर्वाधिक आहे?
Among the following states, which state has the highest density of International Airports in India?
पर्याय (Options):
A
महाराष्ट्र
B
अचूक उत्तर (Official Answer)
केरळ
C
पश्चिम बंगाल
D
कर्नाटक
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर केरळ आहे.
• भारतीय राज्यांमधील केरळ या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांची घनता सर्वाधिक आहे.
• केरळ मधील आंतरराष्ट्रीय विमानतळे:
• तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ.
• एर्नाकुलम जिल्ह्यातील नेदुम्बसेरी मधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ.
• मलप्पुरम जिल्ह्यातील करीपुरमधील कॅलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ.
• कन्नूर जिल्ह्यातील मत्तनूरमधील कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ.
• महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळे:
• छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,मुंबई.
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,नवी मुंबई.
• डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ,नागपूर.
• पश्चिम बंगाल मधील आंतरराष्ट्रीय विमानतळे:
• नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
• बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळ
• कर्नाटक मधील आंतरराष्ट्रीय विमानतळे:
• केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
• मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ