सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर पर्याय 2 आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
नर्मदा नदी खोरे:
• नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतात अमरकंटक येथे होतो.
• ही नदी विंध्यपर्वत आणि सातपुडा पर्वत यादरम्यान आपल्या पश्चिम दिशेला एकूण 1315 कि.मी. वाहत जाते.
• या प्रवासात नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यातून म्हणजे नंदुरबार जिल्ह्याची सीमा तयार करत 54 कि.मी.चा प्रवास करते.
• महाराष्ट्र सीमेवरील या प्रवासास नर्मदेस दक्षिणेकडून उदई व देवगंगा या उत्तर वाहिनी नद्या येऊन मिळतात. तर उत्तरेकडून तवा ही नदी येऊन मिळते.
• याच नदीवर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.
• पुढे ही नदी भरूच येथे अरबी समुद्रास जाऊन मिळते.
• नर्मदा नदीखोरे महाराष्ट्रात 1658 चौरस किमी इतके क्षेत्र व्यापते. महाराष्ट्रातील एकूण जलप्रणाली पैकी हे क्षेत्र केवळ 0.5% इतके आहे.
तापी-पूर्णा नदी खोरे:
• तापी आणि तिची उपनदी पूर्णा या नद्यांचे खोऱ्याचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 51,504 चौरस किमी आहे.
• महाराष्ट्रातील एकूण जलप्रणाली पैकी हे क्षेत्र 16.7% इतके आहे.
• या खोऱ्यात मुख्यत्वे अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार इत्यादि पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश होतो.
• तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे.
• तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर एवढी आहे.
• पूर्णा नदी ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे.
भीमा-कृष्णा नदी खोरे:
• भीमा कृष्णा नदी खोरे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे आहे.
• भीमा ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे
• भीमा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 77 हजार चौरस किलोमीटर इतके असून त्यातील सुमारे 60 टक्के क्षेत्रफळ म्हणजेच 46,184 चौरस किलोमीटर महाराष्ट्रात आहे.
• भीमा नदी पुणे सोलापूर या दोन प्रमुख जिल्ह्यातून वाहते तसेच अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग सातारा सांगली या जिल्ह्यांचा उत्तर भाग व बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागातून भीमा नदी खोरे प्रवाह विस्तारलेला आहे.
• कृष्णा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख 59 हजार चौरस किलोमीटर इतके असून त्यापैकी अकरा टक्के क्षेत्र म्हणजेच 28 हजार 700 किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
• कृष्णा नदी सातारा व सांगली या दोन प्रमुख जिल्ह्यातून वाहत जाते, तसेच कृष्णा खोऱ्याच्या महाराष्ट्रातील भागाचा उल्लेख अप्परकृष्ण म्हणून देखील केला जातो.
• भीमा आणि कृष्णा नदी या दोन्ही नद्यांचे खोरे महाराष्ट्रात एकूण 74,784 चौरस किमी इतके क्षेत्र व्यापते, जे महाराष्ट्रातील जलप्रणालीच्या 22.6% इतके आहे.
गोदावरी नदी खोरे:
• गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे आहे.
• गोदावरी नदीचे खोरे एकूण तीन लाख 13 हजार 389 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्रातील जलवहनाचे क्षेत्र एक लाख 52 हजार 588 चौरस किलोमीटर इतके आहे.
• महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी गोदावरीने 49 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे हे खोरे महाराष्ट्रात 30 उपखोऱ्यात विभागले गेलेले आहे.
• गोदावरी नदीची एकूण लांबी 1450 किलोमीटर असून महाराष्ट्रातील एकूण प्रवास 668 किलोमीटर आहे.
The correct answer is option 2.
Explanation & Key Takeaways:
Narmada River Basin:
• The Narmada River originates at Amarkantak in the Satapuda Mountains of Madhya Pradesh.
• This river flows for a total of 1315 km in its western direction between Vindhya Mountains and Satpura Mountains.
• In this journey, the Narmada River travels 54 km through the northwestern corner of Maharashtra, forming the border of Nandurbar district.
• Narmada is joined by north-flowing rivers Udai and Devganga from the south on this course on the Maharashtra border. From the north comes the river Tawa.
• The Sardar project has been constructed on the border of Maharashtra, Gujarat and Madhya Pradesh on this river.
• Further this river joins the Arabian Sea at Bharuch.
• Narmada river basin covers an area of 1658 sq km in Maharashtra. This area is only 0.5% of the total water system of Maharashtra.
Tapi-Poorna River Basin:
• The basin of Tapi and its tributary Purna rivers covers an area of 51,504 sq km in Maharashtra.
• This area is 16.7% of the total water system of Maharashtra.
• This basin mainly includes the districts of West Vidarbha and North Maharashtra like Amravati, Akola, Buldhana, Dhule, Jalgaon, Nandurbar etc.
• Tapi River is the largest of the major western-flowing rivers of Maharashtra.
• The total length of Tapi river is 724 km and the length in Maharashtra is 208 km.
• Purna River is a major tributary of Tapi River.
Bhima-Krishna river basin:
• The Bhima Krishna river basin is the second largest river basin in Maharashtra.
• Bhima is a major tributary of Krishna
• The total area of Bhima river basin is 77 thousand square kilometers and about 60 percent of that area i.e. 46,184 square kilometers is in Maharashtra.
• The Bhima river flows through two major districts of Pune, Solapur, the Bhima river basin extends through southern part of Ahmednagar district, the northern part of Satara Sangli districts, and some parts of Beed and Osmanabad districts.
• The total area of the Krishna river basin is two lakh 59 thousand square kilometers and about eleven percent of that area i.e. 28 thousand 700 square kilometers is in Maharashtra.
• River Krishna flows through two major districts of Satara and Sangli, the Maharashtra portion of the Krishna basin is also referred to as Upper Krishna.
• The basins of both the Bhima and Krishna rivers cover a total area of 74,784 sq km in Maharashtra, which is 22.6% of Maharashtra's water system.
Godavari River Basin:
• Godavari river basin is the largest river basin in Maharashtra.
• Godavari river basin is 3 lakh 13 thousand 389 square kilometers in total and the drainage area of Maharashtra is 1 lakh 52 thousand 588 square kilometers.
• Godavari occupies 49 percent of the total river basin in Maharashtra. The basin is divided into 30 sub-basins in Maharashtra.
• The total length of Godavari river is 1450 km and the total journey in Maharashtra is 668 km.